Price: ₹49.00 - ₹0.00
(as of May 26, 2025 03:30:50 UTC – Details)
‘लिपन’ लक्ष्मण खोब्रागडे यांचा झाडीबोलीतील कवितासंग्रह समकालीन ग्रामीण जीवनाचे वास्तववादी आणि प्रादेशिक भूप्रदेशाचे खरेखुरे अस्सल जीवनदर्शन घडविणारा आहे. ‘लिपन’ हा झाडीबोलीतील शब्द असला तरी, या शब्दाला कवीने सामाजिक अभिसरणाचे आपल्या कवितेतून अनेक संदर्भ दिले आहेत. ग्रामीण प्रतिभावंतांची विलक्षण अनुभूती प्रकट करणारा हा कवितासंग्रह असून, ‘मोरगाड’ या कवितासंग्रहानंतर विलक्षण प्रतिभेने कवी आता मराठी भाषेत उर्जावंत झाला आहे.
झाडीबोलीत कविता कशी असते याचा आदर्श कवी लक्ष्मण खोब्रागडे आपल्या कवितांतून मराठी रसिकांना घालून दिलेला आहे. शब्दांची अचूक मांडणी आणि मानवी जीवनाचे खरेखुरे वास्तवरूप म्हणजे हा कवितासंग्रह होय. म्हणूनच आजच्या कवितेच्या परिप्रेक्ष्यात लक्ष्मण खोब्रागडे मला झाडीबोलीतील कवितेचा उगवता तारा वाटतो. सुर्यकुलाकडे झेप घेणारा हा कवितासंग्रह आज मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणारा आहे.
– प्रा. दीपककुमार खोब्रागडे
(अध्यक्ष, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ)
ASIN : B09VY4G3KL
Publisher : झाडीबोली साहित्य मंडळ, मूल (जि. चंद्रपूर, महाराष्ट्र) (17 March 2022)
Language : Marathi
File size : 501 KB
Simultaneous device usage : Unlimited
Text-to-Speech : Not enabled
Screen Reader : Supported
Enhanced typesetting : Enabled
Word Wise : Not Enabled
Print length : 119 pages