Price: ₹189.00
(as of Oct 18, 2024 01:37:40 UTC – Details)
इंग्लंड-अमेरिका या पाश्चिमात्य देशांची प्रवासवर्णने आपण सातत्याने वाचत आलो आहोत. त्या परदेशांची अनेक प्रवासवर्णने मराठीमध्ये प्रसिद्ध झाली. इतकी की साहित्यामध्ये ‘प्रवासवर्णन’ हा नवा प्रकार कथा, कादंबरीसारखा रूढ झाला. आमचे लेखक जगभर हिंडतात आणि त्यावर वैपुल्याने लिहितात.
डॉ. नितीन बळवल्ली यांनी मराठीने अलक्षित ठेवलेल्या स्कँडेनिव्हियन देशांमध्ये भ्रमंती करून त्यांची ओळख वाचकांना करून द्यावी, या ऊर्मीने ‘स्कँडिनेव्हियाची नजरभेट’ हे पुस्तक लिहिले आहे. या देशांमध्ये श्रीमंती खूप आहे. अलोट पिकणारी शेती, अपार परिश्रम करणारी माणसे, नवे नवे संशोधन करून मानवजातीला सुखी करणारे, मानवी मूल्यांवर विश्वास ठेवणारे लोक म्हणून या देशांचा उल्लेख होतो.
डॉ. नितीन बळवल्ली यांच्या विचक्षण व रसिक नजरेने एका नजरभेटीत या देशांची सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक वैशिष्ट्ये न्याहाळली आणि सराईत लेखकाच्या वाचनीय, वेधक, ओघवत्या शैलीने हे छोटेखानी पण बहुमूल्य पुस्तक लिहिले.
या पुस्तकामध्ये त्यांनी प्रतिभेचे सृजन प्रगट करून मराठीला एक सुंदर प्रवास वर्णन सादर केले आहे.
– पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
ASIN : B0D3BL8PYB
Publisher : इकोबुकहट (Ecobookhut) (26 May 2024)
Language : Marathi
File size : 54407 KB
Simultaneous device usage : Unlimited
Text-to-Speech : Not enabled
Screen Reader : Supported
Enhanced typesetting : Enabled
Word Wise : Not Enabled
Print length : 122 pages