।। श्री गुरुचरित्र ।। मराठी : ।। Shree Gurucharitra ।। Marathi (Marathi Edition)

#amazon ebooks for kindle unlimited, #amazon kindle ebooks, #amazon.in/ebooks kindle, #can kindle tablets be used to access indian ebooks and audiobooks, #chatgptʼ free kindle ebooks, #ebooks jeffrey archer kindle version, #ebooks kindle cart, #ebooks kindle free for prime, #ebooks kindle free for prime in tamil, #ebooks kindle free novel series, #ebooks kindle innovate and thrive jyoti yadav, #ebooks kindle karachi to malabar an odyssey of love, #ebooks kindle the golden road, #ebooks kindle the psychology of money, #ebooks kindle unlimited, #ebooks kindle verity, #ebooks kindle vortex, #free kindle ebooks download, #free kindle law ebooks, #gujarati kindle ebooks, #kindle ebooks by anupama jeremiah, #kindle ebooks english, #kindle ebooks english free, #kindle ebooks for free, #kindle ebooks for free tamil, #kindle ebooks for kids, #kindle ebooks free with prime, #kindle ebooks hindi, #kindle ebooks hyperspace, #kindle ebooks in hindi, #kindle ebooks in kindle store, #kindle ebooks in kindle store free, #kindle ebooks in kindle store tamil, #kindle ebooks kids, #kindle ebooks marathi, #kindle ebooks on indian cooking, #kindle ebooks reader, #kindle ebooks store, #kindle ebooks suppandi, #kindle ebooks tamil, #kindle ebooks tamil free books, #kindle ebooks wild with you, #kindle edition free ebooks hindi love story, #kindle edition free ebooks john grisham, #kindle free ebooks tamil novels, #kindle free tamil ebooks romances ahila issac novels akila ishak, #kindle unlimited free ebooks, #tamil kindle ebooks jiya

।। श्री गुरुचरित्र ।। मराठी : ।। Shree Gurucharitra ।। Marathi (Marathi Edition)
Price: ₹69.00
(as of May 02, 2025 17:48:19 UTC – Details)



आपले जीवन हे वास्तविक पाहता समृद्ध होत असते, ते आपल्या ग्रंथसंपदेमुळेच. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्येचे उत्तर श्रीकृष्णाने गीतेमध्ये दिले आहे. पण होते काय, आपण अनेक आरत्या, स्तोत्र म्हणत असतो; तरीही बऱ्याच लोकांना त्याचा अर्थच माहीत नसतो. अर्थाशिवाय म्हटलेल्या कुठल्याही गोष्टीचे फक्त पठन होते, मनन नाही. एखाद्या गोष्टीचे मनन झाल्यावरच ती नसानसांत भिनते आणि नित्य जीवनात त्याचा प्रभाव पडतो.

आपली प्रगल्भ, रसाळ ग्रंथसंपदा मनाला न भिडताच मागे रहाते. यासाठीच हे सर्व सोप्या भाषेत लोकांसमोर यायला हवे; त्यामुळेच आपला समाज नैतिक बनेल. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या गीतेवर सोप्या भाषेत अनेक नित्य जीवनातले दाखले देऊन श्री ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली. त्यामुळेच गीता लोकप्रिय झाली.

असाच आपल्या ग्रंथसंपदेतला सुंदर ग्रंथ ‘श्रीगुरुचरित्र’ श्रीदत्तात्रेयांचा दुसरा अवतार असलेले श्रीनृसिंहसरस्वती यांचा जीवनपट यांत आहे. तसेच वेदातल्या काही गोष्टी, धार्मिक विधी करण्याच्या पद्धतीही यात विस्तृतपणे आल्या आहेत. पण त्यातील भाषा मराठी असूनही तो ग्रंथ कळण्यास खूप अवघड आहे. म्हणूनच श्री. प्रताप गोगावले यांनी मूळ गाभ्याची हानी होऊ न देता ‘श्रीगुरुचरित्र’ ग्रंथ अत्यंत सोप्या भाषेत लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक अध्याय गोष्टीरूपात रसाळ भाषेत लिहिला आहे. तो वाचताना असे वाटते, की आपण सुंदर पारिजातकाच्या वृक्षाखाली उभे आहोत आणि पारिजातकाच्या फुलांचा सडाच प्रत्येक अध्यायाच्या रूपाने आपल्या अंगावर बरसत आहे.

पारिजातकाच्या फुलांचा पांढरा रंग पावित्र्य, तर केशरी रंग मांगल्य बरसतो. त्याप्रमाणेच या ग्रंथातील प्रत्येक अध्याय पावित्र्य व मांगल्याचे प्रतीकच आहे. श्रीकृष्णाने स्वर्गीचा पारिजातक वृक्ष पृथ्वीवर आणून लोकजीवन गंधित केले, त्याप्रमाणेच श्री. प्रताप अनंत गोगावले यांनी ‘श्रीगुरुचरित्र’ सोप्या भाषेत लिहून आपले समाजजीवन वैचारिक दृष्टीने सुगंधित करण्याचा प्रयत्न केला आहे.

श्रीगुरुचरित्र ग्रंथपठनाविषयी अनेक कडक नियम सांगितले आहेत, त्यात ते कळण्यास कठीण! त्यामुळेच सामान्य लोक ते वाचायलाच धजावत नाहीत. पण श्रीदत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी सांगितले आहे की, निर्मल अंत:करण असता कोणत्याही स्तोत्राचे पठन करण्यासाठी कोणताही विधिनिषेधु लागत नाही. यातील प्रत्येक अक्षरामधून चैतन्य विलसतच रहाते. त्यामुळेच श्री. प्रताप गोगावले यांनी लिहिलेले ‘श्रीगुरुचरित्र’ प्रत्येकाने निर्मल अंत:करणाने जरूर वाचावे.

आत्तापर्यंत श्रीगुरुचरित्रावर एवढ्या सोप्या, रसाळ, मधुर भाषेत लेखन झालेच नाही. पण हे कार्य श्रीस्वामींनी श्री. प्रताप गोगावले यांच्याकडून करवून घेतले. श्री स्वामी समर्थांची कृपाच श्री. प्रताप गोगावले यांच्यावर असल्याची ही मोठी साक्ष आहे. आजकाल या कलियुगात प्रत्येकाचे मन कुठल्या ना कुठल्या विचाराने गढूळ झाले आहे. श्री. प्रताप गोगावले लिखित या गुरुचरित्र पठनाने या गढूळ मनाची पवित्र अशी झुळझुळ वाहणारी नदी नक्कीच होईल आणि समाज वैचारिकदृष्ट्या सुदृढ बनेल. हे फार अमौलिक कार्य श्री. प्रताप गोगावले यांनी केले आहे. समाज यासाठी सदैव श्री. प्रताप गोगावले यांचा ऋणी राहील.

श्री. प्रताप गोगावलेंच्या या सर्व सेवाकार्यात उतराई होण्याची आमची प्राची-प्रणवसह नैतिक जबाबदारी आता श्रीगुरुचरित्र लेखनामुळे आणखीनच वाढली आहे. आम्ही सर्व कुटुंबीय सदोदित अत्यंत जागृतपणे रामाच्या सेतुबांधणीमध्ये खारीनं वाळू झटकल्याप्रमाणे सेवा करण्याचा निश्चित प्रयत्न करू. श्रीगुरुदेवदत्तात्रेय – श्रीस्वामीसमर्थ पाठीशी आहेतच. या सेवेसाठी त्यांचे आशीर्वाद सदोदित पाठीशी रहावेत, ही श्रीस्वामीचरणी प्रार्थना.

शेवटी एवढीच श्रीस्वामीचरणी प्रार्थना की, श्री. प्रताप गोगावले यांचे आयुष्य रातराणीच्या मंद सुगंधाप्रमाणे स्वामीकृपेने सदैव सुगंधित राहो.

— सौ. प्रज्ञा समीर वालगुडे

आपल्या भारत देशात असंख्य धर्म, जाती-जमाती आहेत. त्यात स्त्रियांसाठी वेगळी वागणूक. सर्वांचा उद्धार व्हावा. गुण्यागोविंदाने सर्व समाज रहावा, ही तळमळ अंतरी ठेवून ही ग्रंथरचना झाली. मूळ श्रीगुरुचरित्रावरून साररूपाने ओवीबद्ध स्वरूपात हा ग्रंथ लिहिला आहे. अत्यंत सोप्या, रसाळ भाषेत हा ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. सोप्या भाषेमुळे श्रीगुरुचरित्र भक्तांना समजेल. समजल्यावर आवडेल. आवडल्यावर पुन: पुन्हा वाचावेसे वाटून भक्ती वृद्धिंगत होईल. कोणत्याही धर्मातील, जातीतील, तसेच स्त्रियांनीही हा ग्रंथ वाचावा. स्वत: श्रीगुरुचरित्रकारांनीच मूळ ग्रंथात सांगितले आहे.

अंत:करण असता पवित्र ।
सदाकाळ वाचावे श्रीगुरुचरित्र ।।

ASIN ‏ : ‎ B088PTYT2B
Publisher ‏ : ‎ Vibhuti Prakashan; 21st edition (15 May 2020)
Language ‏ : ‎ Marathi
File size ‏ : ‎ 56.1 MB
Text-to-Speech ‏ : ‎ Not enabled
Screen Reader ‏ : ‎ Supported
Enhanced typesetting ‏ : ‎ Enabled
Word Wise ‏ : ‎ Not Enabled
Print length ‏ : ‎ 228 pages