Price: ₹99.00
(as of Jun 14, 2025 08:30:30 UTC – Details)
एक वेगळा हुरहुर लावणारा, अत्यंत नाजूक अनुभव शब्दबद्ध करणाऱ्या संहितेचा लेखक आणि तो अनुभव रंगमंचावर आकाराला आणणारा दिग्दर्शक एकच आहे, प्राजक्त देशमुख. तो ज्या दोन बायकांची गोष्ट मांडतो, त्यातली एक आहे संत तुकारामाची बायको आवली आणि दुसरी विठ्ठलाची बायको रखुमाबाई. आवलीच्या पायातला काटा विठ्ठलाने काढला, या आख्यायिकेचा आधार घेऊन प्राजक्त देशमुख यांनी या दोन अलक्षित स्त्रियांना एकत्र आणायचा घातलेला घाटच लक्षणीय आहे. तुकोबांना न्याहारी घेऊन चाललेल्या आवलीच्या पायात काटा रुततो अणि ती बेशुद्ध पडते. त्यानंतर विठ्ठलाच्या आज्ञेवरून आणि तुकोबांच्या विनंतीला मान देऊन रखुमाबाई लखुबाई होऊन आवलीला घेऊन घरी येते. तिचा पाय बरा होईपर्यंत तिची शुश्रूषा करते. तिला घरकामात मदत करते. या दरम्यान दोघी बोलतात. या संवादातूनच त्या एकमेकींना समजून घेतातच पण त्यांना स्वतःचीही ओळख पटत जाते. दोघीही शेवटी आपापल्या नवऱ्यापाशीच येऊन ठेपतात, पण म्हणून या नाटकाचा आशय पुरुषवादी होत नाही. आयुष्याला दिलेला नकार आणि त्याचा आहे तसा केलेला स्वीकार यांच्यातला हा झगडा बनतो. इथे अलौकिक रखुमाईला लौकिक प्रश्न पडतात तर लौकिक आवलीला अंती अलौकिकत्व प्राप्त होतं. विठ्ठलाची मूर्ती लखुबाईने तिथेच सोडून जाणं आणि त्याचा शेला, जो आवलीने पायाच्या जखमेला चिंधी म्हणून बांधला, तो सोबत घेऊन जाणं ही प्रतीकात्मकतादेखील लौकिकाच्या अलौकित्वाला अधोरेखित करून जाते. स्त्री-पुरुष हे द्वैत नसून अद्वैत आहे, याचं भान देवत्व लाभलेल्या रखुमाबाईला आवलीसारख्या संसारी बाईमुळे येतं.
ASIN : B08J3XLQNN
Publisher : Popular Prakashan Pvt Ltd (14 September 2020)
Language : Marathi
File size : 412 KB
Simultaneous device usage : Unlimited
Screen Reader : Supported
Enhanced typesetting : Enabled
Word Wise : Not Enabled
Print length : 70 pages